दोन ट्रकची समाेरासमाेर धडक, धानोऱ्यातील चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST2021-05-20T05:00:00+5:302021-05-20T05:00:32+5:30

दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले तर वाहक जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा राज्यातील करिमनगरजवळ झालेल्या या अपघातातील एका ट्रक धानोरा येथील असून त्यावरील चालक व वाहकही धानोऱ्यातील आहेत.

Two trucks collided head-on, killing the driver on the spot | दोन ट्रकची समाेरासमाेर धडक, धानोऱ्यातील चालक जागीच ठार

दोन ट्रकची समाेरासमाेर धडक, धानोऱ्यातील चालक जागीच ठार

ठळक मुद्देवाहक जखमी, तेलंगणातील करीमनगरजवळ अपघात

लाेकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले तर वाहक जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा राज्यातील करिमनगरजवळ झालेल्या या अपघातातील एका ट्रक धानोरा येथील असून त्यावरील चालक व वाहकही धानोऱ्यातील आहेत.
प्रशांत तुकाराम लेनगुरे (३४, रा.धानोरा) असे मृताचे नाव आहे. तो या अपघातात ठार झाला तर अमन रामटेके (२०, रा.धानोरा) हा वाहक जखमी झाला आहे.
धानोरा येथील अजय दास याच्या मालकीच्या त्या ट्रकमध्ये धानोरा येथून अर्धा व मूलचेरा येथून अर्धा असा मका भरून मंगळवारी दुपारी ३ वाजता करीमनगर येथे जाण्यासाठी निघाला; परंतु करीमनगरजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला उलटले.
वाहकाने ट्रकच्या खिडकीतून उडी घेतल्याने ते जखमी झाले पण जीव वाचला. दोन्ही ट्रकचालक जागीच ठार झाले. 
घटनेची माहिती धानोराच्या वाहकाने मोबाईलवरून ट्रकचालक व मृतांच्या नातेवाईकांना दिली. बुधवारी मृत ट्रकचालकावर धानोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

Web Title: Two trucks collided head-on, killing the driver on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात