विहिरीचे खोदकाम करताना मातीखाली दोन मजूर दबले
By संजय तिपाले | Updated: April 8, 2025 14:16 IST2025-04-08T14:15:26+5:302025-04-08T14:16:19+5:30
मदतकार्य सुरु : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील घटना

Two laborers buried under soil while digging a well
संजय तिपाले
गडचिरोली: शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे विहिरीचे खोदकाम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन मजूर दबले, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.
उप्पाला रवी (३२,) कोंडा समय्या (४०, दोघे रा. जानमपल्ली ता. सिरोंचा) अशी त्यांची नावे आहेत. गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु होते. ५० फूट खोल विहिर खोदली होती. ८ रोजी उपाल्ला रवी व कोंडा समय्या हे दोघे विहिरीत उतरुन खोदकाम करत होते. दरम्यान, याचवेळी मातीचा लगदा कोसळला, त्याखाली दोघेही दबले गेले. यावेळी इतर मजुरांनी आरडाओरड केली, त्यानंतर स्थानिक नागरिक धावले. सर्वांनी मिळून त्या दोघांना विहिरीबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले, पण अद्यापही ते मातीखाली अडकलेेले आहेत.
पोलिसांची धाव
घटनास्थळी सिरोंचा पोलिसांनी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी देखील त्या दोन मजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले, पण अद्याप यश आले नव्हते. तेथे गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.