वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:11+5:30

धानोरा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर राधेश्यामबाबाच्या मंदिराजवळ लेखा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत टिकेश मनिराम बावणे हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. टिकेशच्या आईवडीलाचे निधन झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून टिकेश हा राजोली येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. बुधवारी एमएच ३३ पी ७५३६ क्रमांकाच्या दुचाकीने लेखा गावाकडे निघाला.

Two killed in two separate accidents | वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे ठार

वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे ठार

Next
ठळक मुद्देधानोरा तालुक्यातील घटना : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तर रेतीचा टिप्पर उलटून चालक दगावला

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रेती वाहून नेणारा ट्रक उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बुधवारी झालेल्या दुसऱ्या घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ठार झालेल्यांमध्ये टिनेश मनिराम बावणे (२८) रा. रांगी, अशोक येरूलल्ला (४२) रा. चंद्रपूर यांचा समावेश आहे.
धानोरा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर राधेश्यामबाबाच्या मंदिराजवळ लेखा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत टिकेश मनिराम बावणे हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. टिकेशच्या आईवडीलाचे निधन झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून टिकेश हा राजोली येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. बुधवारी एमएच ३३ पी ७५३६ क्रमांकाच्या दुचाकीने लेखा गावाकडे निघाला. लेखापासून अर्धा किमी अंतरावर राधेशामबाबा मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला रात्री ९ वाजता धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. ही घटना रात्री घडल्याने युवकाचा मृतदेह तिथेच पडून होता. गुरूवारी सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. या घटनेचा अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.
धानोरा तालुक्याच्या मुरूमगावपासून आठ किमी अंतरावर असलेल्या हत्तीगोटानजीक छत्तीसगडवरून रेती घेऊन येणारा एमएच ३४ बीजी ३९७६ क्रमांकाचा भरधाव टिप्पर दुपारी २ वाजता उलटला. यात टिप्पर चालक अशोक येरूलल्ला (४२) याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर येथील महेंद्रकांत मांगलिक यांच्या मालकीचा हा टिप्पर आहे. मांगलिक यांच्या मालकीचे एकूण १० टिप्पर चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर रेती वाहतुकीच्या कामावर सुरू आहे. दरम्यान टिप्पर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. सदर अपघातग्रस्त स्थळ येरकड हा पोलीस मदत केंद्राच्या हद्दित येते. मात्र वृत्त लिहिस्तोवर घटनास्थळावर पोलीस कर्मचारी पोहोचले नव्हते. येरकडचे पोलीस पाटील भैसारे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Two killed in two separate accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात