ट्रॅक्टर उलटून दोघे ठार, अहेरी तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 11:47 IST2021-10-28T11:45:48+5:302021-10-28T11:47:27+5:30
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळ एक ट्रॅक्टर उलटुन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी संद्याकाळी आठच्या सुमारास घडली.

ट्रॅक्टर उलटून दोघे ठार, अहेरी तालुक्यातील घटना
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळ एक ट्रॅक्टर उलटुन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी संद्याकाळी आठच्या सुमारास घडली.
अंकित सिडाम आणि सुनील महेश हटकर अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. माहितीनुसार, सदर ट्रॅक्टर हे तेलंगनातील असून काल संद्याकाळी आठच्या सुमारास जिमलगट्टाकडून जात होते. दरम्यान एक-दोन किमी अंतरावर रस्त्याच्या बाजूला खाली उतरून हे ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेत, अंकित आणि सुनील यांचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.