चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार; एक जण गंभीर
By Admin | Updated: August 20, 2014 23:31 IST2014-08-20T23:31:38+5:302014-08-20T23:31:38+5:30
एका दुचाकीवर बसून पोर्लाकडे जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकीला आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास

चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार; एक जण गंभीर
गडचिरोली : एका दुचाकीवर बसून पोर्लाकडे जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकीला आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मोहझरी गावाजवळ घडली.
एमएच ३३-७८६६ या टाटा सफारी वाहनाचे चालक प्रवीण चंदू जाकेवार आरमोरीवरून गडचिरोलीकडे घेऊन येत होते. दरम्यान गणेश विजय मस्कावार (१९) अंबूज संजय भंडारे (२१), दिनेश दिलीप चिताडे (२७) सर्वजण रा. मूल हे दुचाकीने पोर्लाकडे जात असताना मोहझरीजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या टाटा सफारीला धडक दिली. या धडकेत गणेश विजय मस्कावार, अंबू संजय भंडारे हे दोघेजण जागीच ठार झाले. तर दिनेश दिलीप चिताडे हा गंभीर जखमी झाला. दिनेश चिताडे याला उपचारार्थ नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गणेश मस्कावार, भंडारे व चिताडे हे पोर्ला येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला हेडलाईट नसल्यामुळे मोहझरीपासून अर्धा किमी अंतरावर अंधारात दुचाकी विरूध्द दिशेला गेली. दरम्यान आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दोघे ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सफारी टाटा वाहन चालक प्रवीण चंदू जाकेवार रा. येल्ला ता. सिरोंचा हल्ली मु. रामनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर वाहन हे गडचिरोली येथील लिना हकीम यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निलकंठ पेंदाम करीत आहेत.
(शहर प्रतिनिधी)