गडचिरोली जिल्ह्यात मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:42 IST2019-01-21T15:42:31+5:302019-01-21T15:42:55+5:30
देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील विसोरा गावाजवळच्या इटियाडोह कालव्याजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या पिकअप या मालवाहू वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

गडचिरोली जिल्ह्यात मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील विसोरा गावाजवळच्या इटियाडोह कालव्याजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या पिकअप या मालवाहू वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला. विलास देवराम बोगा (२७) रा.चिखली, ता. कुरखेडा असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पिकअप वाहन एमएच ३४, २७६८ हे देसाईगंजच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून येणा?्या दोन दुचाकींना त्या वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. यामुळे विलासचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रोशन गजभिये (४०) आणि प्रशांत बनसोड (४७) दोघेही राहणार देसाईगंज हे जखमी झाले. त्यांना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेची नोंद वडसा पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दादा नगरकर करत आहे.
विलास बोगा हा चिखली येथील रहिवासी असून चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथे काम करायचा. मुलगी पाहण्यासाठी नागभिडवरून सकाळीच गावाकडे निघाला होता. मात्र त्याच्या लग्नवरातीऐवजी अंत्ययात्रा काढण्याची दुदैर्वी वेळ विलासच्या कुटुंबियांवर आली आहे.