वाहन उलटून १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:08 IST2019-07-25T00:07:47+5:302019-07-25T00:08:28+5:30
अहेरी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील झिमेला फाट्यावर बोलोरो पीकअप वाहनाचे टायर फुटल्याने सदर वाहन पलटून चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले. सदर अपघात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.

वाहन उलटून १५ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/गुड्डीगुडम : अहेरी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील झिमेला फाट्यावर बोलोरो पीकअप वाहनाचे टायर फुटल्याने सदर वाहन पलटून चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले. सदर अपघात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.
गंभीर जखमींमध्ये वनीता मोहुर्ले (३२), निरंजना मोहुर्ले (३२), बादल कोटरंगे (१८), ईश्वर मोहुर्ले (२४), मंदा हजारे (३७), सुजाता निखाडे (३०), श्वेता गुरनुले (२०), महादेव मंगाम (५१) यांचा समावेश आहे. या सर्वांना अहेरी येथून चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चालकासह इतर सहा जण किरकोळ जखमी आहेत.
जखमी झालेले सर्वजन डांबरी रस्ता बनविण्यासाठी गेले होते. काम आटोपून ते चारचाकी वाहनाने बोरी गावाकडे परत येत होते. दरम्यान झिमेला फाट्याजवळ चारचाकी वाहनाचा टायर फुटला. यामुळे वाहन मार्गावर चारवेळा उलटला. जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेने अहेरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. चालक महेंद्र गजबे हा किरकोळ जखमी आहे.