रानडुकराचे मांस विकणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:02 IST2018-08-27T00:01:37+5:302018-08-27T00:02:51+5:30
रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोली शहरात आणले जात असताना वन विभागाच्या कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचून दोन आरोपींना मासांसह अटक केली आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली.

रानडुकराचे मांस विकणाऱ्या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी गडचिरोली शहरात आणले जात असताना वन विभागाच्या कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचून दोन आरोपींना मासांसह अटक केली आहे. सदर कारवाई रविवारी करण्यात आली.
प्रशांत वासुदेव भैसारे (२७), सदाशिव जनार्धन वेलादी (४५) दोघेही रा. आंबेशिवणी अशी आरोपींची नावे आहेत. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील जंगलात रानडुकराची शिकार करून त्याचे मांस गडचिरोली येथे आणले जात असल्याची गोपनीय माहिती वनाधिकारी यांना प्राप्त झाली. त्यानुसार वन कर्मचाºयांनी पोटेगाव मार्गावर सापळा रचला व आरोपींची तपासणी केली असता, त्यांच्याकडे रानडुकराचे सात किलो मांस आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, सदर मांस गडचिरोली येथे विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले. सदर कारवाई सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी दिलीप कैलुके, वनरक्षक बी. पी. राठोड, आर. के. चव्हाण, के. व्ही. मुनघाटे, डी. एस. धुर्वे यांनी केली. दोन्ही आरोपींना वनक्षेत्र सहायक पाथरी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.