शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

वनजमीन न मिळाल्याने रखडला तुलतुली प्रकल्प

By admin | Updated: May 28, 2015 00:54 IST

तालुक्यातील खोब्रागडी नदीवर प्रस्तावित तुलतुली हा मोठा सिंचन प्रकल्प रखडलेला आहे.

केंद्र सरकारचे दुर्लक्ष : खोब्रागडी नदीवर बांधकाम
आरमोरी : तालुक्यातील खोब्रागडी नदीवर प्रस्तावित तुलतुली हा मोठा सिंचन प्रकल्प रखडलेला आहे. या प्रकल्पाच्या पर्यायी वनजमिनीची आवश्यकता पूर्ण करता न आल्याने हा प्रकल्प रखडलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
तुलतुली गावाजवळ खोब्रागडी नदीवर हा प्रकल्प होणार होता. या प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता १७ डिसेंबर १९७९ रोजी देण्यात आली. १९१५.७० लक्ष रूपये त्यावेळी या प्रकल्पावर खर्च होणार होता. सदर प्रकल्पाची ३० हजार ५९० हेक्टर सिंचन क्षमता निश्चित करण्यात आली होती. या प्रकल्पावर ६२०.८५ लक्ष रूपयांचा खर्च प्रकल्पाचे काम बंद होईपर्यंत झालेला आहे. या प्रकल्पाच्या प्राथमिक कामात १९८० मध्ये सुरूवात करण्यात आली. त्यावेळी धरणस्थळ करीता पोच मार्ग, स्थायी/ अस्थायी इमारत, गोडावून, धरण स्थळाचे स्ट्रिपींग इत्यादी कामे मे १९८३ पर्यत सुरू होती. सदर प्रकल्पामध्ये २२२८.०६ हेक्टर वनजमिन बाधित होत असून सदर प्रकल्पाचे काम वनजमिन निर्वणीकरण मान्यतेअभावी बंद आहे. तेव्हापासून शासनस्तरावर हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. अनेकदा निवडणुका आल्या की हा प्रकल्प मार्गी लावू असे आश्वासन दिले जाते. मात्र अद्यापही या प्रकल्पाबाबत निर्णय झालेला नाही. या प्रकल्पाची किंमतही आता वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रकल्प निर्मितीतील अडचण
केंद्र शासनाचे निर्देशाप्रमाणे लाभक्षेत्राकरिता पर्यायी प्रकल्प होण्याचे दृष्टीने अभ्यास अन्वेषण मंडळामार्फत करण्यात आला असून पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर यांनी ११ जून २०१० अन्वये प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २४३.८० मी. ऐवजी २३८.०० मी. घेऊन त्याप्रमाणे प्रस्ताव मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांना सादर केले. करण्यात आलेल्या पर्यायी वनजमीन आवश्यक त्या प्र्रमाणात कमी करता आलेली नसल्याचे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर यांनी २३ जून २०१२ चे पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे सदर प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव मंडळाचे पत्र १९ डिसेंबर २०१२ अन्वये प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात आला.