जनावरे नेणारा ट्रक पकडला

By Admin | Updated: July 21, 2014 23:51 IST2014-07-21T23:51:25+5:302014-07-21T23:51:25+5:30

चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या मॅक्स पीकअप वाहनाला गडचिरोली पोलिसांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयासमोर पकडल्याची घटना रविवारी

The truck carrying the cattle caught | जनावरे नेणारा ट्रक पकडला

जनावरे नेणारा ट्रक पकडला

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या मॅक्स पीकअप वाहनाला गडचिरोली पोलिसांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयासमोर पकडल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेसंदर्भात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख रियान शेख नजिद (२६) रा. कलगाव ता. दिग्रस, जि. यवतमाळ असे आहे. प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील रहिवासी शेख रियान शेख नजिद व इरफान उद्दीन हे दोघे जण दर्शनीमाल परिसरातील जनावरांना एमएच २९ एम १४३० या मॅक्स पीकअप वाहनाने चामोर्शी मार्गे गडचिरोलीवरून यवतमाळकडे जात होते. दरम्यान काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार व शहर अध्यक्ष सुनिल डोगरा यांच्या मजुरांनी या घटनेची माहिती त्यांना दिली. त्यांनी लागलीच चामोर्शी मार्गावर धाव घेऊन जनावरे घेऊन जाणाऱ्या मॅक्स पीकअप वाहनाला गोंडवाना सैनिकी विद्यालयासमोर अडविले व या दोघांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लगेच गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक वाघ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. जनावरांसह ट्रक जप्त केला. तसेच ट्रक चालक आरोपी शेख रियान शेख नजिद याला अटक केली. दुसरा आरोपी इरफान उद्दीन हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी या दोनही आरोपींवर जनावरांना निर्दयीपणे वागणूक प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ११ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. या ट्रकमध्ये ६ गायी व १ बैल असे ४० हजार रूपयाचे सात जनावरे होती. यापैकी दोन जनावरे मृत्यूमुखी पावल्याची माहिती आहे. पोलिसांनी उर्वरित पाच जनावरे कोंडवाड्यात टाकली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The truck carrying the cattle caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.