ट्रक व खासगी बसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:39 IST2019-07-06T23:38:34+5:302019-07-06T23:39:19+5:30

देसाईगंजवरून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात असलेली खासगी बस व विरूध्द दिशेने येणाऱ्या युपी ७० एफटी ४६४७ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध शुक्रवारी ३.३० वाजता घडला. या अपघातात खासगी बस चालकाला गंभीर मार लागला. तसेच एक प्रवाशी सुध्दा जखमी झाला.

Truck and private buses | ट्रक व खासगी बसची धडक

ट्रक व खासगी बसची धडक

ठळक मुद्देसंडे अँकर । वैनगंगा नदी पुलावरची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंजवरून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात असलेली खासगी बस व विरूध्द दिशेने येणाऱ्या युपी ७० एफटी ४६४७ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध शुक्रवारी ३.३० वाजता घडला. या अपघातात खासगी बस चालकाला गंभीर मार लागला. तसेच एक प्रवाशी सुध्दा जखमी झाला. जखमींना देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प पडली. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर दोन्ही वाहने बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मोठी दुर्घटना टळली
ट्रक व खासगी बसची धडक देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध घडली. या धडकेत एखादे वाहन नदीत पडण्याचा धोका होता. नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. मात्र सुदैवाने वाहन नदी पात्रात कोसळले नाही.

Web Title: Truck and private buses

टॅग्स :Accidentअपघात