गडचिरोलीतील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसची भीषण धडक; चार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:25 IST2019-01-16T10:19:10+5:302019-01-16T12:25:46+5:30
बुधवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

गडचिरोलीतील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसची भीषण धडक; चार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: बुधवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. या बसमध्ये काही प्रवासी अडकल्याचे समजते. सकाळच्या वेळेस निघालेली ही बस शाळकरी विद्यार्थ्यांनी अधिक भरली होती असेही एक वृत्त आहे.
ठार झालेल्यांमध्ये मंजूर करपे (४८) अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली, शामला प्रभाकर डोंगरे (४७) अहेरीच्या कोर्टात लिपीक, प्रकाश पत्रूजी अंबादे (४८) अहेरीच्या वनविभागात कार्यरत व अमोल गावडे, वर्ग १० वा यांचा समावेश आहे.
संतप्त जमावाने पेटवला ट्रक
अपघाताचे दृश्य पाहून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अपघातग्रस्तट्रकसह लोहखनिज घेऊन जाणारे अन्य ट्रकही यावेळी जाळण्याचा प्रयत्न केला आहे.