विनापरवानगी तलावाची पाळ फाेडून झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:33+5:302021-04-17T04:36:33+5:30
वैरागड येथील भूमापन क्रमांक ८८३ ची आठ एकर पोट खराब (लागवडीस अयोग्य) असलेली सातबारावरील जमीन आरमोरी येथील एका इसमाने ...

विनापरवानगी तलावाची पाळ फाेडून झाडांची कत्तल
वैरागड येथील भूमापन क्रमांक ८८३ ची आठ एकर पोट खराब (लागवडीस अयोग्य) असलेली सातबारावरील जमीन आरमोरी येथील एका इसमाने खरेदी केली. चूनबोडी जंगल परिसरात ही लागवडी अयोग्य जमिनीत पूर्वी बोडी होती. मूळ मालकांकडून ही जमीन विकत घेतल्यानंतर जमीन खरेदी करणाऱ्यांनी ही जमीन लागवडीयोग्य करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे त्या तलावाची पाळ नष्ट केली. आणि पोटखराब क्षेत्रात जी मोहफुलाची झाडे होती ती अनधिकृतपणे त्या झाडाच्या बुंध्याशी असलेली माती ट्रॅक्टरच्या दोन फारी नांगराने काढून नष्ट केली जात आहेत; पण याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे.
गौण उपजाची विनापरवानगी झाडे नष्ट करणाऱ्या शेतजमीन मालकावर वनविभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
नष्ट करण्यात येत असलेली मोहफुलाची झाडे
कोट...
सातबारावरील निर्धारित क्षेत्रापेक्षा संबंधित शेतकऱ्यांनी अधिक वन जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ते काम थांबविण्यात आले आहे. जर मोहफुलाची झाडे अनधिकृतपणे नष्ट केली जात असतील तर कारवाई होईल.
विलास शिवणकर
वनरक्षक, वैरागड.