परंपरागत ज्ञानाला विज्ञानाची जोड
By Admin | Updated: July 19, 2014 01:10 IST2014-07-19T01:10:30+5:302014-07-19T01:10:30+5:30
आदिवासींकडे असलेल्या परंपरागत ज्ञानाला विज्ञान व

परंपरागत ज्ञानाला विज्ञानाची जोड
शिक्षण : गोंडवाना विद्यापीठ व विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगात करार
गडचिरोली : आदिवासींकडे असलेल्या परंपरागत ज्ञानाला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देत उच्च दर्जाच्या वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये १८ जुलै रोजी करार झाला आहे.
यावेळी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, नागपूर विभागाचे आयुक्त अनुपकुमार, प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता,विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक डॉ. एन. एस. कोकोडे मुख्य वनसंरक्षक रेड्डी, डॉ. डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठात यापूर्वीच राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान सेंटर स्थापन करण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठ व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यात पाच वर्षासाठी करार झाला. या करारानुसार जनरल बॉडीची स्थापना करण्यात येणार आहे. या जनरल बॉडीच्या निर्णयाप्रमाणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या विज्ञान तंत्रज्ञान केंद्र वाटचाल करणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने आहेत. मात्र या संसाधनांचा योग्य व पुरेसा वापर केला जात नसल्याने या जिल्ह्यात गरीबी पहावयास मिळते. नैसर्गिक संसाधानांवर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून वस्तूंचा दर्जा वाढवून अधिकचे मूल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. येथील आदिवासींकडे शेकडो वर्षापूर्वीचे परंपरागत ज्ञान आहे. या ज्ञानाला शेकडो वर्षाच्या जंगलातील अनुभवाची साथ आहे. परंपरागत ज्ञानाला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देऊन नैसर्गिक संसाधनांचा अत्यूच्च वापर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. येथील तरूणांना शिक्षण, प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे मोठे योगदान राहणार आहे. (नगर प्रतिनिधी)

ग्रामीण भागात नैसर्गिक संसाधाने मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र सोयीसुविधा नाहीत. तर शहरी भागात सोयीसुविधा आहेत. मात्र नैसर्गिक संसाधने उपलब्ध नसल्याने ती ग्रामीण भागातूनच आणावी लागतात. ही विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सोयीसुविधा नसल्याने ग्रामीण भागातील युवक शहरी भागाकडे धाव घेत चालला आहे. त्यामुळे शहरे फुगत आहेत. तर ग्रामीण भाग ओस पडत चालला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शहर व ग्रामीण यांचे मिश्रण असलेले शहर वजा गावे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.