ट्रॅक्टर-टिप्परची समोरासमोर धडक
By Admin | Updated: February 1, 2015 22:55 IST2015-02-01T22:55:23+5:302015-02-01T22:55:23+5:30
वाहतूक करणारा ट्रक आणि गिट्टी वाहून नेणाऱ्या टिप्परची समोरासमोर धडक बसल्याने टिप्पर चालक जखमी झाल्याची घटना रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास वैरागड-कढोली

ट्रॅक्टर-टिप्परची समोरासमोर धडक
चालक जखमी : वैरागड-कढोली मार्गावरील सावलखेडानजीकची घटना
वैरागड : वाहतूक करणारा ट्रक आणि गिट्टी वाहून नेणाऱ्या टिप्परची समोरासमोर धडक बसल्याने टिप्पर चालक जखमी झाल्याची घटना रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास वैरागड-कढोली मार्गावरील सावलखेडाजवळ घडली. रस्त्याच्या मधोमध सदर अपघात घडल्याने या मार्गावर तीन ते चार तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
छत्तीसगड ते आंध्रप्रदेश अशी वाहतूक करणारा डीजी ०७-८३०५ हा मालवाहक ट्रक कुरखेडा फाट्यावरून वैरागडमार्गे आंध्र प्रदेशाकडे जात होता.
आरमोरीवरून कुरखेडाकडे गिट्टी घेऊन जाणारा एमएच ३१ एम ८१३१ या टिप्परची समोरून धडक बसली. यात टिप्पर चालक जखमी झाला. अपघातातील दोन्ही वाहने क्षतिग्रस्त झाली. या मार्गावरील जानेवारी महिन्यातील अपघाताची ही चवथी घटना आहे.
विशेष म्हणजे, शनिवारी याच मार्गावर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. (वार्ताहर)