सहा रूग्णांची भर; नऊ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:45+5:30
शनिवारी रात्री ७२ एसआरपीएफ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरा दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या चेन्नई येथून आलेला मजूर, बंगलूरू येथून आल्यानंतर भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेला तसेच मुंबईवरून परतलेल्या चामोर्शी येथील एका कुटुंबातील नऊ वर्षाची मुलगी कोरोनाबाधित आढळून आली आहे. ती संस्थात्मक विलगीकरणात होती.

सहा रूग्णांची भर; नऊ कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शनिवारी रात्री दोन एसआरपीएफ जवान व इतर तिघेजण तसेच रविवारी पुन्हा तीन नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नऊ रूग्णांना कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात व जिल्हाबाहेर नोंद असलेल्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १९७ झाली आहे.
शनिवारी रात्री ७२ एसआरपीएफ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरा दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या चेन्नई येथून आलेला मजूर, बंगलूरू येथून आल्यानंतर भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेला तसेच मुंबईवरून परतलेल्या चामोर्शी येथील एका कुटुंबातील नऊ वर्षाची मुलगी कोरोनाबाधित आढळून आली आहे. ती संस्थात्मक विलगीकरणात होती. त्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर येथील एका व्यक्तीच्या अंत्यविधीला हैद्राबाद येथून आलेल्या कुटुंबाच्या संपर्कामुळे जैरामपूर येथील दोन पुरूष व एक महिला कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे.
सीआरपीएफचे चार जवान, गडचिरोली तालुक्यातील इतर तीन व्यक्ती, मुलचेरा व धानोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या १९७ झाली आहे.
तसेच जिल्हा व जिल्ह्याबाहेरील एकूण रूग्णांची संख्या ३३८ झाली आहे. एकूण १४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आत्तापर्यंत ११ हजार ११७ नमुन्यांची तपासणी
गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ७७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या १ हजार ६९५ नागरिक जिल्हाभरातील विलगीकरण कक्षात आहेत. रविवारी ७६ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. जिल्ह्यात सध्या १५ सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत.