शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या कामात अहेरी, एटापल्ली तालुके माघारले

By admin | Updated: January 15, 2017 01:27 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात

बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले आहेत. यापैकी १५ हजार २६४ शौचालय पूर्ण झाले आहेत. अहेरी व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक शौचालय अपूर्ण स्थितीत असून हे तालुके शौचालय बांधकामात माघारले आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अहेरी तालुक्याला ४ हजार २९३ व एटापल्ली तालुक्याला २ हजार ८३० वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षात प्रशासनाला दिले आहेत. यापैकी आतापर्यंत अहेरी तालुक्यात १२०० तर एटापल्ली तालुक्यात १ हजार १३० शौचालयाचे काम पूर्ण झाले आहेत. अद्यापही अहेरी तालुक्यात ३ हजार ९३ व एटापल्ली तालुक्यात १ हजार ७०० शौचालयाचे काम अपूर्ण आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत सर्व शौचालयाचे काम पूर्ण करून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला आहे. या संदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनीही सर्व ग्रामसेवकांना ३१ मार्च २०१७ पर्यंत शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च २०१७ पर्यंत गावातील शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी दिले आहेत. संपूर्ण बाराही तालुक्यात आतापर्यंत ५० टक्के पेक्षा कमी शौचालयाचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित १८ हजार ९८१ शौचालयाचे काम येत्या अडीच महिन्यात पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात शौचालयाच्या कामात गती नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी) ७ हजार ४२५ लाभार्थ्यांना ८९१ लाख रूपये अनुदान वाटप स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम हाती घेतलेल्या तसेच पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील जवळपास ७ हजार ४२५ लाभार्थ्यांना ८९१ लाख रूपयांचे अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ६८.२८ लाख, आरमोरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ५७.१२ लाख, भामरागड ४३.२० लाख, चामोर्शी १२६.१२ लाख, धानोरा १०९.३२ लाख, एटापल्ली ४०.५६ लाख, गडचिरोली ९९.४८ लाख, कोरची ९७.६८ लाख, कुरखेडा ५३.७६ लाख, मुलचेरा ९६.७२ लाख तर सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांना ९८.७६ लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अनुदान मिळूनही काही लाभार्थी शौचालयाच्या कामात दिरंगाई करीत आहेत.