युरिया खरेदीसाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:34+5:30
देलनवाडी येथील आविका संस्थेला यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी २५ टन इतके युरीया खताचा पुरवठा झाला आहे. या भागात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आविका संस्थेला पुरवठा झालेल्या खताच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून वापराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे २५ टन युरीया खत लवकरच संपणार आहे. आधी आपल्याला खत मिळावे, या हेतूने शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन आविका संस्थेच्या केंद्रावर खत खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

युरिया खरेदीसाठी तोबा गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात मध्यम व जडप्रतीच्या धानाची वाढ होण्यासाठी युरीया खताची गरज आहे. डौलावर आलेल्या पिकाला आणखी उभारी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून युरीया खताची खरेदी वाढली आहे. देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
देलनवाडी येथील आविका संस्थेला यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी २५ टन इतके युरीया खताचा पुरवठा झाला आहे. या भागात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आविका संस्थेला पुरवठा झालेल्या खताच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून वापराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे २५ टन युरीया खत लवकरच संपणार आहे. आधी आपल्याला खत मिळावे, या हेतूने शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन आविका संस्थेच्या केंद्रावर खत खरेदीसाठी मोठी गर्दी केली.
आविका संस्थेने प्रशासनाकडून आणखी युरीया खताची मागणी करून ते शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. या भागातील अनेक शेतकरी शेतात युरीया खत टाकत असल्याचे दिसून येत आहे.