लग्न आटोपून परत निघालेल्या तिघांचा भीषण अपघात ! टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू तर, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:18 IST2025-10-27T20:17:13+5:302025-10-27T20:18:45+5:30

आरमोरी टी-पॉइंटजवळ अपघात : नागपूरला केले रेफर

Three people returning from wedding meet in horrific accident! One dies, two seriously injured in tipper accident | लग्न आटोपून परत निघालेल्या तिघांचा भीषण अपघात ! टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू तर, दोघे गंभीर

Three people returning from wedding meet in horrific accident! One dies, two seriously injured in tipper accident

गडचिराेली : आरमोरीवरून गडचिरोलीकडे भरधाव जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एक जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, २७ ऑक्टाेबर राेजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास आरमोरी- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील बर्डी टी-पॉइंटजवळ घडली.

मृत व्यक्तीचे नाव सारंग रवींद्र शेंडे (वय ३१, रा. आवळगाव, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे आहे. तर डेव्हिड नवलू मडावी (वय ३५) आणि महेंद्र सुखाराम जांगधुर्वे (वय ३२, दोन्ही रा. येरकड, ता. धानोरा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथे मडावी नावाच्या नातेवाईकाकडे लग्न हाेते. याच साेहळ्यासाठी ते आले हाेते. साेहळा आटाेपून सारंग शेंडे, डेव्हिड मडावी व महेंद्र जांगधुर्वे हे तिघेही एमएच ३३ एजे २७३५ क्रमांकाच्या माेपेड दुचाकीने आरमोरीहून आवळगावकडे गेले होते. तेथील काम आटोपून ते परत आरमोरीकडे येत असताना, एमएच ४० सीटी ११५५ क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की दुचाकीवरून तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात चालक सारंग शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डेव्हिड मडावी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

टिप्पर चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू

धडक दिल्यानंतर टिप्पर चालक वाहनासह फरार झाला असून, आरमोरी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे व पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले करत आहेत.

Web Title : शादी के बाद दर्दनाक हादसा: एक की मौत, दो गंभीर रूप से घायल

Web Summary : गडचिरोली के पास एक तेज रफ्तार टिप्पर ट्रक ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे एक की मौत हो गई और दो गंभीर रूप से घायल हो गए। पीड़ित शादी से लौट रहे थे। टिप्पर चालक फरार हो गया; पुलिस जांच कर रही है।

Web Title : Tragic Accident After Wedding: One Dead, Two Seriously Injured

Web Summary : A speeding tipper truck collided with a motorcycle near Gadchiroli, killing one and severely injuring two. The victims were returning from a wedding. The tipper driver fled; police are investigating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.