शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अबुझमाडच्या जंगलातील चकमकीत एकूण तीन माओवाद्यांना ‎कंठस्नान, एका जवानाला वीरमरण, ‎धुमश्चक्री सुरूच

By संजय तिपाले | Updated: February 6, 2026 10:12 IST

Gadchiroli News: ‎​३ फेब्रुवारीपासून भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेत ६ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका महिला माओवाद्यासह एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला. आतापर्यंत एकूण ३ माओवादी ठार झाले आहेत.

गडचिरोली - छत्तीसगडच्या सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोंनी ५ फेब्रुवारी रोजी एका माओवद्याला ठार केले होते, तर एक जवान जखमी झाला होता. घटनास्थळी आणखी दोन माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, या कारवाईत जखमी झालेले जवान दीपक चिन्ना मडावी (३८, रा. दामरंचा ता.अहेरी, ह. मु. अहेरी) यांना वीरमरण  आले आहे.

३ फेब्रुवारीपासून भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेत ६ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका महिला माओवाद्यासह एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला. आतापर्यंत एकूण ३ माओवादी ठार झाले असून, त्यांच्याकडून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

​जवान दीपक मडावींना वीरमरण‎​या चकमकीत जखमी झालेले सी-६० जवान दीपक चिन्ना मडावी (३८, रा. अहेरी) यांना  हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

‎​आणखी एक जवान जखमी; प्रकृती स्थिर‎​याच मोहिमेदरम्यान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे जवान देखील गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने बाहेर काढून भामरागड येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथे हलवण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

अबुझमाडचा परिसर अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाचा आहे. या भागात अजूनही माओवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.‎- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

English
हिंदी सारांश
Web Title : Abujhmad Encounter: Three Maoists Killed, Soldier Martyred, Operations Continue

Web Summary : Three Maoists were killed in an encounter in Abujhmad forest. A C-60 commando, Deepak Madavi, succumbed to his injuries and was martyred. Operations continue in the dense forest where more Maoists are suspected to be hiding. One AK-47 and one SLR rifle were seized.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली