पावणे तीन लाखांचे सागवान जप्त
By Admin | Updated: August 25, 2014 23:59 IST2014-08-25T23:59:54+5:302014-08-25T23:59:54+5:30
सिरोंचा वनविभागातील बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत बोरमपल्ली गावानजीक वनपरिक्षेत्राधिकारी व क्षेत्र सहायकांनी गस्ती घालून ३८ सागवान पाट्या जप्त केल्याची घटना २४ आॅगस्ट

पावणे तीन लाखांचे सागवान जप्त
बामणी/जिमलगट्टा : सिरोंचा वनविभागातील बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत बोरमपल्ली गावानजीक वनपरिक्षेत्राधिकारी व क्षेत्र सहायकांनी गस्ती घालून ३८ सागवान पाट्या जप्त केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी रविवारला ४.३० वाजताच्या सुमारास घडली. बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी लिंगाडे व क्षेत्रसहायक विशाल सालकर यांनी गुप्त माहितीच्या आधारे बोरमपल्ली गावात गस्त घालून अंदाजे २ लाख रूपये किंमतीचे ३८ सागवान पाट्या जप्त केल्या. या प्रकरणातील वनतस्कर फरार झाले.
जिमलगट्टा, रेपनपल्ली वनविभागातील कर्मचारी गस्त घालत असतांना शनिवारच्या मध्यरात्री कर्नेली गावाजवळ वनतस्करांकडून ९० हजार रूपये किंमतीचे २.२०२ घनमिटरचे २० सागवान लठ्ठे जप्त केले. दरम्यान ७ वनतस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी सदु आलाम, अशोक आत्राम, नामदेव आत्राम तिघेही राहणार कर्नेली यांना अटक केली. वनतस्कर तेलंगणातील वेमनपल्ली येथे सागवान विकण्यासाठी घेऊन जात होते. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी पाटील, आरएफओ पुसनाके, गंजीवार, गोरूळे, दहागावकर, लामपासे, घारगुंडे, शिरोळे यांनी केली. (वार्ताहर)