वैनगंगा नदीत तीन मुलींना जलसमाधी, नाव उलटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 18:15 IST2021-05-18T18:14:02+5:302021-05-18T18:15:42+5:30
Gadchiroli news चामोर्शी तालुक्यातील वाघोली या गावातील 3 मुलींचा वैनगंगा नदीत डोंगा (छोटी नाव) उलटून झालेल्या अपघातात पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा अपघात सकाळी घडला.

वैनगंगा नदीत तीन मुलींना जलसमाधी, नाव उलटून अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वाघोली या गावातील 3 मुलींचा वैनगंगा नदीत डोंगा (छोटी नाव) उलटून झालेल्या अपघातात पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा अपघात सकाळी घडला. तिघींचेही मृतदेह सापडले आहेत. मृत मुलींमध्ये सोनी मूकरू शेंडे, समृध्दी ढिवरु शेंडे (रा.वाघोली) या चुलत बहिणी आणि पल्लवी रमेश भोयर (रा.येवली) या त्यांचा आत्येबहिणीचा समावेश आहे. तिघीही 12 ते 14 वर्ष वयोगटातील आहेत. यातील सोनी ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून ती यावर्षी आठव्या वर्गात होती.
या तिघी मुली डोंग्याने वैनगंगा नदीच्या पैलतीरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या आमराईत आंबे आणण्यासाठी जात होत्या. पण खोल पाण्यात त्यांचा डोंगा उलटल्याचे सांगितले जाते. या अपघातात नावाडी बचावला पण तीनही मुली पाण्यात बुडाल्या. शोधमोहीमेनंतर तिघींचे मृतदेह सापडले.