शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

By admin | Updated: July 27, 2014 23:44 IST

सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील शेतकऱ्याच्या तीन म्हशी रविवारी दुपारी ३ वाजता विजेचा धक्का लागून मरण पावल्या. या घटनेत शेतकऱ्याचे १ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.

आरडा गावातील घटना : शेतकऱ्याचे एक लाखांचे नुकसानसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील शेतकऱ्याच्या तीन म्हशी रविवारी दुपारी ३ वाजता विजेचा धक्का लागून मरण पावल्या. या घटनेत शेतकऱ्याचे १ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या आरडा येथे बैकन राजन्ना या शेतकऱ्याच्या तीन म्हशी चरण्यासाठी शेतशिवारात गेल्या होत्या. या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेला तार तुटून पडलेला होता. तिनही म्हशींचा जीवंत विद्युत तारेशी स्पर्श झाल्याने त्या जागीच मरण पावल्या. सिरोंचा तालुक्यातील आरडा भागात पावसाळ्याच्या दिवसात वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडली आहे. शेतकऱ्याचे या घटनेत १ लाख रूपयाचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे सिरोंचा येथील कनिष्ठ अभियंता कटकमवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व शेतकऱ्याला शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे शेतकरी बैकन राजन्ना यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला त्वरीत आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात विजेच्या जीवंत तारेचा धक्का लागून ५ ते ७ जणावरे दगावले आहेत. (शहर प्रतिनिधी)