शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

घरात चुली पेटविण्यासाठी सरपण आणायला गेल्या; टिपून बसलेल्या वाघाने एकाच गावातील दोन महिलांचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:01 IST

Gadchiroli : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. गरिबीमुळे वाघाच्या भीतीच्या सावटातही उपजीविकेसाठी जंगलातून सरपण आणावे लागते. वाघ शिकारीवर टपूनच असतो व हल्ला करतो. देऊळगावातही हेच घडले. सरपण गोळा करताना दोन महिलांना वाघाने भक्ष्य बनविले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दोन घटना आरमोरी तालुक्यात बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्या. वाघाच्या दहशतीतही सरपणाने चुली पेटविणाऱ्या दोन मातांची अखेर चिताच पेटली.

जंगलालगतच्या गावात सरपणासाठी जाणे हा महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग. मात्र, हीच दिनचर्या दोन मातांसाठी मृत्यूचे दार ठरली. मुक्ताबाई दिवाकर नेवारे (वय (७०) आणि सरस्वताबाई झिगर ताघ (वय ७०, रा. देऊळगाव, ता. आरमोरी) या दोन्ही महिलांचे मृतदेह बुधवारी दोन वेगवेगळ्या शोधमोहिमेत सापडले.

मुलाला वाटले आई गेली ताईकडे, पण घडले आक्रीत; आठ दिवसांपासून सुरू होता शोध सरस्वताबाई झिगर वाघ ह्या देऊळगाव येथील झोपडपट्टी टोलीवर राहत होत्या. शेती नसल्यामुळे कुटुंब मोलमजुरीवर, मुलापासून वर्षानुवर्षे दूर राहणाऱ्या सरस्वताबाईचा संसार तुटका, पण मन मात्र मुलांकडेच. १२ नोव्हेंबरला त्या सरपणासाठी घराजवळच्या झुडपी जंगलात गेल्या. दिवस गेला... दोन दिवस गेले... मुलाला वाटले त्या कदाचित सावत्र मुलीकडे सावलखेडा येथे गेल्या असतील. शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर आठ दिवसांनी घराजवळील झुडपी जंगलातून येणाऱ्या दुर्गंधीने सर्वांचे लक्ष वेधले. शोथमोहिमेअंती घरापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी जमा केलेल्या काड्या, परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यामुळे वाघाने हल्ला केल्याचा संशय वास्तवात बदलला.

मुलीला आईची प्रतीक्षा; पण सायंकाळी घरी आला मृतदेह, कुटुंबाचा आक्रोश !

मुक्ताबाई नेवारे यांना दोन मुली. एक मुलगी इंजेवारी येथे दिली आहे, तर दुसरी मुलगी देऊळगावातच नांदते. मुक्ताबाई या बुधवारी दुपारी सरपणासाठी घरापासून अवघ्या अर्था किलोमीटर अंतरावर जंगलात गेल्या. त्यांची मुलगी धान कापणीसाठी शेतावर, संध्याकाळी मुलगी घरी परतली तेव्हा आई दिसेना.

शेजाऱ्यांना विचारले असता 'काडांना गेल्या' इतकीच माहिती मिळाली. सायंकाळ झाली, अंधार वाढला, तरी मुक्ताबाई परतल्या नाहीत. गावकऱ्यांनी पोलिस व वनविभागाला कळवले. अंधारात सुरू झालेल्या शोधमोहिमेत रात्री ७:३० वाजेच्या सुमारास जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. दोन मुलींच्या या आईचा जीव सरपणाच्या चुलीसाठी चुकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger Kills Two Women Collecting Firewood in Maharashtra Village

Web Summary : Two women from Deulgaon, Maharashtra, died after being attacked by a tiger while collecting firewood. Driven by poverty, they ventured into the forest near their village. Their bodies were found after separate searches, highlighting the deadly struggle for survival in the area.
टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्याGadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूforestजंगलforest departmentवनविभागPoliceपोलिस