अo्रूंनी सार्‍यांचेच डोळे पाणावले

By Admin | Updated: May 12, 2014 23:38 IST2014-05-12T23:38:18+5:302014-05-12T23:38:18+5:30

मुरमुरी जंगल परिसरात नक्षल्यांनी रविवारी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात गडचिरोली पोलीस दलाचे सात जवान शहीद झाले.

They all have eyes | अo्रूंनी सार्‍यांचेच डोळे पाणावले

अo्रूंनी सार्‍यांचेच डोळे पाणावले

गडचिरोली : मुरमुरी जंगल परिसरात नक्षल्यांनी रविवारी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात गडचिरोली पोलीस दलाचे सात जवान शहीद झाले. या शहिदांना सोमवारी सकाळी ८.३0 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत भावपूर्ण o्रध्दांजली अर्पण करण्यात आली. o्रू असेच दृश्य सर्वत्र दिसत होते. पोलीस मुख्यालयात ऐरवी इकडूनतिकडे कामासाठी धावणारे पोलीस जवान आज प्रचंड तणावात होते. याच वातावरणात पोलीस मुख्यालयात शहीद सात जवानांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यापूर्वी सर्व शहीद जवानांच्या पार्थिवावर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील शामीयानात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, सहाय्यक महासंचालक रश्मी शुक्ला आदी पोहोचले व शहीदवीरांच्या कुटुंबियांचा भावनांचा बांध फुटला. यावेळी कुटुंबियांचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांत्वन करून महाराष्ट्र शासन व संपूर्ण पोलीस दल आपल्या पाठीशी आहे, असे सांगून सर्वांना आश्‍वस्त केले. तोपर्यंत शामीयानात ठेवण्यात आलेल्या शहीद विरांचे पार्थिव उचलून वाहनामध्ये ठेवण्यासाठी त्यांच्या सहकार्यांची लगबग सुरू झाली होती. कुटुंबीयांना आधार देत आपल्या सहकार्‍यांचे पार्थिव खांद्यावर वाहून नेत वाहनापर्यंत पोहोचून देण्यात येत होते. कुटुंबीयांना गावाकडे सोडण्यासाठीही वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अo्रू व मनात नक्षलवाद्यांविषयीचा संताप दिसून येत होता. (स्थानिक प्रतिनिधी)o्रध्दांजली अर्पण करण्यासाठी पोलीस मैदानावर धाव घेतली. सकाळी ८.३0 नंतर रामनगर वार्ड सामसूम वाटत होता. वयोवृध्द नागरिकांसह युवक, युवती व महिलांनीही पोलीस मुख्यालयावर गर्दी केली होती. त्या ठिकाणी रामनगरवासीयांना अo्रूंना आवरता आले नाही. चामोर्शीवरूनही शेकडो नागरिक मानवंदना कार्यक्रमासाठी आले होते.

सकाळपासूनच जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानाचा परिसर व या भागाकडे जाणारे सर्व रस्ते माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते. वाहनांचीही प्रचंड गर्दी झाली होती. सर्वांना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोहोचण्याची घाई झाली होती. पोलीस मुख्यालयाचे मैदान माणसांनी भरून गेले होते. निरव शांतता व हुंदक्यांचा आवाज व अनेकांच्या डोळ्यात अ

रामनगरवासीयांची पोलीस मुख्यालयाकडे धाव

नक्षल्यांच्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सात जवानांपैकी तीन जवान शहरातील रामनगर परिसरात भाड्याने वास्तव्यास होते. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे दुर्योधन मारोती नाकतोडे व चंद्रपूरातील सुनिल तुकडू मडावी हे दोनही पोलीस जवान तुकडोजी चौक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भाड्याने वास्तव्यास होते. तसेच चामोर्शी येथील रोशन हनुमंत डंबारे हा पोलीस जवान रामनगरात आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्यास होता. हे तिनही जवान गेल्या अनेक दिवसांपासून रामनगरात वास्तव्यास होते. यामुळे या तिघांचे व त्यांच्या कुटुंबियांचे रामनगरवासीयांशी स्नेहाचे संबंध होते. हे तिनही जवान अनेक नागरिकांच्या परिचयाचे होते. वार्डातील सामाजिक कार्यक्रमातही ते हिरीरीने सहभागी व्हायचे. यामुळे हे तिघेहीजण वार्डात लोकप्रिय होते. यामुळे सोमवारी सकाळीच रामनगरातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी

.

Web Title: They all have eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.