शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागरण मेळाव्यातून लाच विरोधात जनजागृती होणार

By admin | Updated: September 9, 2014 23:29 IST

गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे प्रमाणही कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या जनजागरण मेळाव्यातून लाचविरोधात जनजागृती करणार आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली.गडचिरोली येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते म्हणाले की, आपण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अहेरी येथे २००७ मध्ये काम केले आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. नागरिकांमध्ये सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढाकार घेणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने दुर्गम भागातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे फोन नंबर व मोबाईल नंबर तसेच टोल फ्री नंबर असलेले फलक लावण्याबाबतही संबंधित कार्यालयांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जनजागरण मेळावे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या मेळाव्यातही लाच संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्याचे काम आगामी काळात केले जाणार आहे. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारींची संख्या वाढावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अलिकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘स्टाप करप्शन सेव्ह नेशन’ ही मोहीम सुरू केली असून या अंतर्गत १०६४ हा टोल फ्री नंबरही नागरिकांना देण्यात आला आहे. नागरिकांनी यावर तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. या कामासाठी काही स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जनजागृतीसाठी अन्य माध्यमांचाही वापर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. न्यायालयातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संबंधीत प्रकरणात शिक्षेचे प्रमाण आता वाढले आहे. तक्रारीही लोक जागृतीमुळे अधिक प्रमाणात येऊ लागल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)