गुण संपादनापेक्षा ज्ञान संपादनाकडे कल वाढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:24+5:30

येथील गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’मध्ये बुधवारी ‘व्हिजन २०३०’ या विषयावरील वर्क्तृत्व स्पर्धेत १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत आपल्या स्वप्नातील पुढील १० वर्षातील भारताची कल्पनाच मांडली. यात सध्या देशापुढे असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासोबतच त्या आव्हानांवर मात करून पुढे जाण्याची आशाही व्यक्त करण्यात आली.

There should be a trend toward knowledge editing rather than editing points | गुण संपादनापेक्षा ज्ञान संपादनाकडे कल वाढावा

गुण संपादनापेक्षा ज्ञान संपादनाकडे कल वाढावा

Next
ठळक मुद्दे‘व्हिजन २०३०’ : वर्क्तृत्व स्पर्धेत नव्या पिढीकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अलीकडे सर्वजण ज्ञान संपादनापेक्षा गुण संपादनाला अधिक महत्त्व देत आहेत. पण पुढील १० दहा वर्षात हे चित्र बदलणे गरजेचे आहे. गुण संपादनापेक्षा ज्ञान संपादनाकडे नवीन पिढीचा कल वाढला पाहीजे, त्यातूनच भारत देश अधिक समृद्ध होईल, असा सूर अनेक विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी वर्क्तृत्व स्पर्धेतून व्यक्त केला.
येथील गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’मध्ये बुधवारी ‘व्हिजन २०३०’ या विषयावरील वर्क्तृत्व स्पर्धेत १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत आपल्या स्वप्नातील पुढील १० वर्षातील भारताची कल्पनाच मांडली. यात सध्या देशापुढे असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासोबतच त्या आव्हानांवर मात करून पुढे जाण्याची आशाही व्यक्त करण्यात आली. केवळ सैन्यबळ वाढल्याने आपण महासत्ता होणार नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न व्हायला पाहीजे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक दर्जा व उंची वाढायला हवी अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि मराठीतून आपले विचार मांडले.
परीक्षक म्हणून डॉ.अरुण पाटील (नागपूर), डॉ.मंजिरी वैद्य (मुंबई) आणि प्रा.चंद्रशेखर मलकमपट्टे (उद्गीर) यांनी जबाबदारी सांभाळली.

शिबिरात ३२ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
इंद्रधनुष्य-२०१९ चे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने विद्यापीठ परिसरात बुधवारी रक्त तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३२ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, डॉ.प्रिया गेडाम आदी उपस्थित होते. गुरूवारीही पुन्हा शिबिर शिबिर होणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयात रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.मुकूंद धबाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरेश कंदीकुरवार, मुरलीधर पेद्दीवार, सतीश तडकलावार, जीवन गेडाम यांनी सहकार्य केले.

Web Title: There should be a trend toward knowledge editing rather than editing points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.