शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

३६४ शाळांचे विद्युतीकरण नाही

By admin | Updated: February 28, 2017 00:44 IST

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : दुर्गम भागातील शेकडो शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधांचा अभावगडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी अडचण जाणवत आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५० प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चार हजारवर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शाळांमध्ये शौचालय, प्रसाधनगृह, संरक्षण भिंत तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाची सुविधा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अद्यापही विद्युतीकरणाची सोय न झालेल्या ३६४ शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील आठ, आरमोरी तालुक्यातील आठ, कुरखेडा सात, धानोरा ३१, चामोर्शी १२, अहेरी ७८, एटापल्ली ७६, सिरोंचा ५३, मुलचेरा ९, कोरची २७ व भामरागड ५५ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचा सराव करण्यासाठी शाळेमध्ये विद्युतीकरण असणे आवश्यक आहे. मात्र ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरण नसल्याने लाऊडस्पीकर लावता येत नाही. परिणामी दिवसाच सांस्कृतिक कार्यक्रम उरकून घ्यावे लागतात. विद्यमान राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेमधील परिपाठ हा लाऊडस्पीकरच्या सहाय्याने घ्यावयाचा आहे. मात्र विद्युतीकरण न झालेल्या शाळांमध्ये परिपाठ पूर्वीसारखाच लाऊडस्पीकरशिवाय घेतला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)२७० शाळांना संरक्षण भिंत नाहीगडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील एकूण २७० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही संरक्षण भिंती उभारण्यात आल्या नाही. त्यामुळे या शाळांच्या परिसरात दिवसा व रात्री मोकाट जनावरे प्रवेश करतात. विद्यार्थीही असुरक्षित राहतात. संरक्षण भिंत नसलेल्या शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९, आरमोरी ९, कुरखेडा १७, धानोरा ३६, चामोर्शी ३६, अहेरी ५१, एटापल्ली २८, सिरोंचा २०, मुलचेरा ७, कोरची २२ व भामरागड तालुक्यातील ३५ शाळांचा समावेश आहे.वर्गखोलीतच बसतात अनेक मुख्याध्यापकएकूण १ हजार ५५० जि.प. शाळांपैकी ९७२ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तब्बल ५७८ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे या शाळांमधील मुख्याध्यापक वर्गखोलीतच बसून शाळेतील प्रशासकीय कामकाज सांभाळतात.६९२ शाळांमध्ये क्रीडांगणाची व्यवस्था नाहीजि.प.च्या एकूण ६९२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचा सराव करण्यासाठी क्रीडांगणाची (मैदान) व्यवस्था नाही. त्यामुळे क्रीडा विकासावर परिणाम होत आहे.