जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुडगूस, जारावंडीत गोदामाचा दरवाजा तोडला
By संजय तिपाले | Updated: May 13, 2023 15:02 IST2023-05-13T15:01:40+5:302023-05-13T15:02:17+5:30
रानटी हत्तींच्या कळपाने वर्षभरापासून धानोरा, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घातला.

जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुडगूस, जारावंडीत गोदामाचा दरवाजा तोडला
संजय तिपाले
गडचिरोली: जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत. वर्षभरापासून धुडगूस घालणाऱ्या या कळपाने एटापल्ली तालुक्याकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. जारावंडीत १२ मे रोजी हत्तीने एका गोदामाचा दरवाजा तोडून मातीचे घर पाडले आहे.
रानटी हत्तींच्या कळपाने वर्षभरापासून धानोरा, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घातला. उभ्या पिकांचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण आहेत. या रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. १२ मे रोजीरात्री एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील जारावंडी येथे एका हत्तीने धुडगूस घातला. १२ मे रोजी रात्री या हत्तीने धान्य दोदामाचा लोखंडी दरवाजतातोडून आत प्रवेश केला. शिवायनजीकच असलेल्या एका घराचीतीही तोडफोड केली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्रूांत भीतीचे वातावरण निर्माण आले आहे. वनविभागाने तात्ाकळ रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हत्तीला डिवचू नका....
भामरागड वनविभागांतर्गत कसनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने परिसरातील नागरिकांना एका पत्रकाद्वारे खबरदारीचे आवाहन केले आहे. रानटी हत्ती दिसल्यास डिवचू नका, सेल्फीसाठी जवळ जाऊ नका, फटाके फोडू नका, दगड मारु नका असे आवाहन करण्यात आले आहे. हत्तींकडून हल्ा होण्याची शक्यता असते, त्यामुळे वनरक्षक, वनपाल यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.