सरकारनेच सांगावे, सात रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना कशी मिळणार पोषण शक्ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:26 IST2025-08-05T19:23:56+5:302025-08-05T19:26:28+5:30

Gadchiroli : मुख्याध्यापक केळी उधार घेऊन आणतात. शासनाकडून पैसे जमा होत नसल्याने उधारी वाढत चालली आहे.

The government should tell us how students will get nutrition for just seven rupees. | सरकारनेच सांगावे, सात रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना कशी मिळणार पोषण शक्ती ?

The government should tell us how students will get nutrition for just seven rupees.

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
शाळेतील भोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पोषण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेंतर्गत तांदळासोबत पूरक खाद्य बनविण्यासाठी शासनाकडून प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ६.७८ रुपये व उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी केवळ १०.१७रुपये खर्च केले जातात.


एवढ्या खर्चात खरंच विद्यार्थ्यांना पोषक आहार देणे शक्य आहे काय, असा प्रश्न आहे. आवड निर्माण व्हावी. एकदा शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांला पुन्हा दुपारच्या जेवणासाठी घरी जाण्याची पाळी येऊ नये तसेच त्याचे पोषण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत मध्यान्ह भोजन योजना सुरू केली होती. आता या योजनेच्या नावात बदल करून विद्यार्थ्यांना शाळेबद्दल प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे नाव दिले आहे. नाव जरी पोषण शक्ती असले तरी प्रतिविद्यार्थी अनुदान कमी आहे. पोषण आहारासाठी वाढीव अनुदानाची मागणी लीला फाऊंडेशनचे प्रफुल मेश्राम यांनी केली आहे.


असे आहे मेन्यू कार्ड
सोमवारी मसूर पुलाव, मंगळवारी वाटाणा पुलाव, बुधवारी मटकी, उसळ, गुरुवारी मसूर दाळ पुलाव, शुक्रवारी अंडा किंवा केळी सोबत व्हेज पुलाव, शनिवारी वाटाणा मसाले भात यांचा समावेश करण्यात आला आहे.


शाळेत पोषण आहाराचा धूर
भाजीपाला व इंधनासाठी प्रतिविद्यार्थी व प्रतिदिवस केवळ २.१९ रुपये एवढाच खर्च मंजूर आहे. एवढ्या पैशात गॅस खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे गावातील एखाद्या व्यक्तीकडून सरपण खरेदी करतात व चुलीवरच करतात. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून शासन धूर मुक्त चूल करण्याचा प्रयत्न करीत असला तरी शाळेत मात्र पोषण आहाराचा धूर निघत आहे.


परसबागांची भाजीपाल्यासाठी मदत
भाजीपाल्यासाठी शासनाकडून अत्यंत कमी पैसे मिळतात. शाळांनी आता परिसरात परसबाग फुलविण्यास सुरुवात केली आहे. परसबागेच्या माध्यमातून जवळपास आठ महिने काही प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होते. त्याचा दुपारच्या जेवणात उपयोग केला जात आहे.


५९ पैशांची वाढ यावर्षीच्या सत्रात झाली आहे. मागील शैक्षणिक सत्रात प्रतिविद्यार्थी खर्च मर्यादा ६,१९ रुपये होती. त्यात ५९ पैशांनी वाढ करून ती ६.७८ पैसे झाली आहे, तर उच्च प्राथमिक वर्गातील प्रतिविद्यार्थी खर्च मर्यादा ९.२९ रुपयांवरून १०.१७रुपये केली आहे. केवळ ८८ पैशांची वाढ केली आहे.

Web Title: The government should tell us how students will get nutrition for just seven rupees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.