मुलीची प्रकृती बिघडत होती पण डॉक्टर बघायला येत नव्हते.. ११ महिन्यांच्या चिमुकलीच्या वडिलांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:34 IST2026-03-06T13:34:07+5:302026-03-06T13:34:50+5:30

Gadchiroli : आल्यामुळे ताप येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केलेल्या ११ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला.

The girl's condition was deteriorating but the doctor was not coming to see her.. Serious allegations by the father of the 11-month-old child | मुलीची प्रकृती बिघडत होती पण डॉक्टर बघायला येत नव्हते.. ११ महिन्यांच्या चिमुकलीच्या वडिलांचे गंभीर आरोप

The girl's condition was deteriorating but the doctor was not coming to see her.. Serious allegations by the father of the 11-month-old child

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
आल्यामुळे ताप येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केलेल्या ११ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप केला, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

वंशिका साजन लेनगुरे (रा. दिभना ता. गडचिरोली) असे मृत बालिकेचे नाव आहे. वंशिकाला गेल्या काही दिवसांपासून तापाने ग्रासले होते. ४ मार्च रोजी तिची प्रकृती खालावल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. रक्त तपासणीत तिचे हिमोग्लोबिन केवळ ६.२ असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, इतकी गंभीर स्थिती असतानाही तिला रक्त चढवण्यात आले नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. 

डॉक्टर केबिनबाहेर आलेच नाहीत!

मृत बालिकेचे वडील साजन लेनगुरे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे मी वारंवार डॉक्टरांना सांगत होतो, पण ते केबिनच्या बाहेर यायला तयार नव्हते. आम्हालाच वारंवार मुलीला त्यांच्या केबिनमध्ये न्यावे लागत होते, असे साजन यांनी संताप व्यक्त करताना सांगितले.

पदाधिकाऱ्यांची धाव, डॉक्टरांसोबत वाद

  • घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.
  • संतप्त नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने तणाव वाढला होता.
  • खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने धाव घेत रुग्णालय परिसरात बंदोबस्त लावला, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
  • या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली.

Web Title : लापरवाही से बच्ची की मौत; डॉक्टर पर उदासीनता का आरोप

Web Summary : गढ़चिरौली में कथित चिकित्सा लापरवाही से 11 महीने की बच्ची की मौत हो गई। पिता का आरोप है कि डॉक्टरों ने उसकी बिगड़ती हालत पर ध्यान नहीं दिया और हीमोग्लोबिन का स्तर कम होने के बावजूद रक्त नहीं चढ़ाया। परिजनों ने विरोध प्रदर्शन कर घटना की जांच की मांग की, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप किया।

Web Title : Negligence Alleged as Girl Dies; Doctor Apathy Claimed

Web Summary : An 11-month-old girl died in Gadchiroli due to alleged medical negligence. Her father claims doctors ignored her deteriorating condition, failing to administer a blood transfusion despite low hemoglobin levels. Relatives protested, demanding an investigation into the incident, prompting police intervention.