पोलिसावर बलात्काराचा गुन्हा ! लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:48 IST2025-02-26T15:47:29+5:302025-02-26T15:48:00+5:30
Gadchiroli : २४ तासांत लैंगिक अत्याचाराची दोन प्रकरणे समोर आली.

The crime of rape on the police! Sexual assault on a young woman by luring her into marriage
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निलंबित पोलिस शिपायाविरोधात गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मनोज सुंदरलाल धुर्वे (३०) रा.आलापल्ली असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी आणि मनोजच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मनोजने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक प्रस्थापित केले. पीडित मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाली असल्याची बाब युवतीच्या लक्षात येताच, तिने गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. मनोज धुर्वेच्या विरोधात बीएनएस ६९ अन्वये गुन्हा दाखल करून, त्याला २४ फेब्रुवारी रोजी अटक केली. न्यायालयाने एक त्याला दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
त्यानंतर त्याच दिवशी कुरखेडा ठाण्यात गुन्हा नोंद केला. गावातील लोकप्रतिनिधींनी पीडितेची अद्याप भेट घेतली नाही. अशा लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे गीता हिंगे यांनी म्हटले आहे. वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार, रूपाली कावळे, रेखा उईके, अलका पोहणकर, भूमिका बरडे, पायल कोडापे, भारती खोब्रागडे, कोमल बारसागडे, अंजली देशमुख उपस्थित होत्या. या सर्वांनी पीडितेला धीर दिला.
कुरखेडा तालुक्यात महिलेवर अत्याचार
कुरखेडा तालुक्यातील चिखली या गावात ३६ वर्षीय महिलेवर एकटी गाठून अत्याचार केल्याची घटना १८ फेब्रुवारीला घडली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पीडितेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांनी २५ रोजी केला.
३६ वर्षीय महिला १८ रोजी उन्हात बांधलेल्या शेळ्या गोठ्यात बांधण्यासाठी गेली होती. यावेळी अनिल लक्ष्मण मच्छीरके (३८) याने तिला एकटीला गाठून गोठ्यात अत्याचार केला. ओरडू नको, नाही तर बदनामी करेन, मारून टाकीन, अशी धमकी देत कुकर्म केल्यानंतर तो निघून गेला