शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन म्हणते जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पिकांची स्थिती उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिके नसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तहसीलदार यांचेकडून माहिती संकलीत करून गडचिरोली जिल्ह्याची सन २०२२-२०२३  या वर्षांची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वच गावांतील पिकांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. यावरून पिकांची स्थिती चांगली असल्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिकेनसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

नदीकाठचे शेत पडीक तरीही पैसेवारी ५० पैसेच्यावरप्राणहिता, गाेदावरी, वैनगंगा, पर्लकाेटा, पामुलगाैतम, इंद्रावती या मुख्य नद्यांसह इतरही नद्यांना तीन ते चारवेळा पूर आला. पुराची माती अनेकांच्या शेतात जमा झाली आहे. दाेन ते तीन वेळा राेवणी केल्यानंतरही पूर आला. त्यामुळे अनेकांचे शेत आता पडीक आहेत. तरीही या गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्यावर दाखविली आहे. 

धानपीक जाेमातखरीप हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली जाते. अगदी सुरूवातीपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नव्हती, अशाही शेतकऱ्यांचे धान डाेलत आहे. ऑक्टाेबर महिन्यातही पाऊस झाल्याने तलाव, बाेड्यांच्या पाण्याची गरज न पडताच पीके निघाली आहेत. पुढे वातावरण चांगले राहिल्यास धानपिकाचे चांगले उत्पादन हाेऊन असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक अंदाज

हंगामी पैसेवारी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर केली जाते. यामध्ये पीक परिस्थितीचा प्राथमिक आढावा राहते. त्यामुळे या पैसेवारीला हंगामी पैसेवारी समजले जाते. कारण शेतात पीके अजूनही उभे आहेत. आता जरी पिकांची स्थिती चांगली असली तरी पुढे एखादा राेग, पूर, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान हाेऊ शकते. त्यामुळे हंगामी पैसेेवारीला फारसे महत्त्व नाही. ही पैसेवारी केवळ अंदाज आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यावेळी खरीप पिके निघाली असतात. या पैसेवारीवरूनच जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अंदाज येताे. त्यानुसार शासन संबंधित जिल्ह्यासाठी याेजना लागू करते. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी