शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता हंगाम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम हा वार्षिक आर्थिक बजेट ठरविणारा महत्त्वाचा हंगाम आहे. तेंदूपत्ता हंगामातून मिळणाºया रकमेतून पाच ते सहा महिन्याचा मजुरांचा बजेट होत असते.

ठळक मुद्देसंचारबंदीचा परिणाम : गोंदियातील कंत्राटदार कोरचीत येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कमी दिवसात भरपूर रोजगार देणारा व बऱ्यापैकी आर्थिक मिळकत मिळवून देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन हंगामाकडे पाहिले जाते. दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात हा हंगाम एप्रिल महिन्यापासून सुरू होत होता. मात्र यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे हा हंगाम लांबणीवर गेला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे यंदा गोंदिया जिल्ह्यातील तेंदू कंत्राटदार कोरची तालुक्यात येणार आहेत.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम हा वार्षिक आर्थिक बजेट ठरविणारा महत्त्वाचा हंगाम आहे. तेंदूपत्ता हंगामातून मिळणाºया रकमेतून पाच ते सहा महिन्याचा मजुरांचा बजेट होत असते. पेसा वनहक्क कायद्यान्वये वनोेपज खरेदी-विक्री करण्याचा अधिकार कोरची तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामसभांना मिळाला आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातच कोरची येथील राजीव भवनात तेंदू लिलावाची प्रक्रिया घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आला. सहा हजार प्रती गोणी तेंदू संकलन करावयाचे असून याचा दर प्रती शेकडा ६०० रुपये असा देण्यात आला आहे.
ग्रामसभेमार्फत तेंंदूलिलाव प्रक्रिया झाल्यानंतर ग्रामपंचायस्तरावरील निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे ग्रामसभेला तेंदू घटकाचे करारनामे करता आले नाही. त्यानंतर कोरोनाच्या संचारबंदीमुळे तेंदूपत्ता संकलनाचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. यावर्षी देशावर कोरोनाचे संकट कोसळले. परिणामी लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद पडले. जिल्हा सीमाही बंद करण्यात आल्या. तेंदूपत्ता तोडण्यासाठी दरवर्षी कोरची तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गोंदिया जिल्हा व इतर राज्याच्या गावांमधील शेकडो तेंदू मजूर कोरची तालुक्यात येतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट आल्याने परराज्यातील व गोंदिया जिल्ह्यातील मजूर कोरची तालुक्यात येणार नाही.

कंपनीचे मॅॅनेजर दाखल
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील सिमरन ट्रेडर्स कंपनीच्या मालकाने तेंदू हंगामासाठी मॅनेजर लोकांना २८ एप्रिल रोजी कोरचीत पाठविले. त्यांच्यासोबत चेकर, मुंशी, हमाल येणार होते. मात्र कोरोनामुळे मॅनेजरने या कामगारांना आणले नाही. या पदावर स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग