तहसीलवर मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 21:58 IST2017-11-24T21:57:45+5:302017-11-24T21:58:08+5:30
शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन .....

तहसीलवर मोर्चा धडकला
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे, प्रा. संजय मंगर यांनी केले. दुपारी जुन्या बसथांब्याजवळील तथागत बुद्ध विहारापासून मोर्चाला सुरूवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. शासनाच्या सर्व योजना अपयशी झाल्या असून जनतेमध्ये शासनाप्रति तीव्र नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून सहा महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शासनाने ६५ वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना मासिक पाच हजार रूपये पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसह शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, कोणत्याही शेतकºयांच्या जमिनी बळजबरीने शासनाने संपादन करू नये, शेतमालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार शेतकºयांना मिळावा, याकरिता शेतकरी लवादाची निर्मिती करावी, कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची यादी तत्काळ जाहीर करून बँकेच्या मुख्य फलकावर लावावी, मच्छिमार सोसायट्यांना जिल्हा परिषद अंतर्गत लिजवर तलाव द्यावे, ग्रा. पं. द्वारा ठेका पद्धती बंद करण्यात यावी, मच्छिमार सोसायट्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मोर्चात शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले. याप्रसंगी श्रावण भानारकर, विलास कोडापे, डॉ. कैलास नगराळे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, देवानंद बाविस्कर, क्षीरसागर शेंडे, सचिन गेडाम, प्रवीण डांगे, सुमित खोब्रागडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.