शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू

By admin | Updated: May 4, 2016 02:39 IST

शिक्षकांचे तीन महिन्यांपासूनचे प्रलंबित वेतन, वेतनवाढ थकबाकी, शिक्षक व केंद्रप्रमुखांचे सेवापुस्तके आदीसह विविध

चामोर्शी : शिक्षकांचे तीन महिन्यांपासूनचे प्रलंबित वेतन, वेतनवाढ थकबाकी, शिक्षक व केंद्रप्रमुखांचे सेवापुस्तके आदीसह विविध मुद्यांवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चामोर्शीच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी सोमवारपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी २७ एप्रिल रोजी संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी यांना निवेदन देऊन २ मे पासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात कोणताही निर्णय पंचायत समिती प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे शिक्षकांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपात पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कोमेरवार, विभागीय उपाध्यक्ष नत्थू पाटील, चामोर्शी तालुकाध्यक्ष नीलेश खोब्रागडे, देवराव चौधरी, बाबुराव मडावी, नरेश सोरते, अमोल चव्हाण, बालाजी पवार, परिषदेचे तालुका सचिव देविदास गणवीर, तालुका उपाध्यक्ष उद्धव केंद्रे, डी. जी. चौधरी यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. पंचायत समिती प्रशासनाने ४ मेपर्यंत शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास ५ मे गुरूवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते शिक्षक व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)या आहेत मागण्या४मागील तीन महिन्यांपासून ७२ शाळांमधील शिक्षकांचे वेतन तत्काळ अदा करावे, शिक्षकांची वेतनप्रणाली सुरळीत करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षण घ्यावे, चामोर्शी पं. स. अंतर्गत १४ केंद्रप्रमुखांचे फेब्रुवारी व महिन्यांचे वेतन अदा करावे, सन २००५-०६ मध्ये नियुक्त झालेल्या ४७ अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन न काढणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, पं. स. अंतर्गत सर्व शिक्षक व केंद्रप्रमुखांनी सेवापुस्तक अद्यावत करावे, कार्यरत नसणाऱ्या शिक्षकाचे नोव्हेंबर, डिसेंबर २०१५ चे वेतन काढणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, शिक्षकांचा घरभाडे भत्ता देण्यात यावा.