कारच्या धडकेत शिक्षक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:01 IST2019-05-01T00:01:02+5:302019-05-01T00:01:42+5:30
विरूध्द दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाच्या डोक्याला मार लागला. सदर घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता धानोरा-गडचिरोली मार्गावर धानोरापासून दोन किमी अंतरावर कन्हारटोला येथे घडली.

कारच्या धडकेत शिक्षक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : विरूध्द दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाच्या डोक्याला मार लागला. सदर घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता धानोरा-गडचिरोली मार्गावर धानोरापासून दोन किमी अंतरावर कन्हारटोला येथे घडली.
शिवराम सखाराम उईके (४८) रा. कन्हारटोला असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. शंकर खोब्रागडे (४७) रा. चंद्रपूर असे कार मालकाचे नाव आहे. उईके आपल्या एमएच ३३ यू २९७१ क्रमांकाच्या दुचाकीने धानोरावरून कन्हारटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जात होते. कारमधील दोघे पतीपत्नी हे लग्नाकरिता चंद्रपूरवरून खांबाळा येथे जात होते.
कन्हारटोला वळणावर कारची दुचाकीला धडक बसली. यात उईके यांच्या डोक्याला मार लागला. तसेच कारही रस्त्याच्या कडेला झुडूपात शिरली. कारमधील पती-पत्नी हे सुखरूप आहेत. शिक्षकाला सर्व प्रथम ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले.
कन्हारटोलाचे वळण धोकादायक
कन्हारटोला वळणावर दूरचे वाहन दिसत नाही. अगदी जवळ वाहन आल्यावर नजरेस पडते. यामुळे या ठिकाणी नेहमीच लहान, मोठे अपघात होतात. १२ दिवसांपूर्वी याच ठिकाणी ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसली व दोन युवक ठार झाले होते. या ठिकाणी दोन्ही बाजुने रस्ता खोलगट आहे व मध्यंतरी उंच आहे. एक रस्ता एकीकडे तर दुसरा कन्हारटोला गावात जातो. त्यामुळे येथे चौक तयार झाला आहे. या ठिकाणी गतिरोधक बांधणे गरजेचे आहे.