आलापल्लीजवळ अपघातात टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष ठार
By Admin | Updated: August 16, 2014 23:28 IST2014-08-16T23:28:28+5:302014-08-16T23:28:28+5:30
आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर आलापल्लीपासून ५ किमी अंतरावर ट्रक व बोलेरो गाडीत झालेल्या अपघातात अहेरी तालुका टॅक्सी चालकमालक संघटनेचा अध्यक्ष ठार झाल्याची घटना १४ आॅगस्ट रोजी

आलापल्लीजवळ अपघातात टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष ठार
आलापल्ली/अहेरी : आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर आलापल्लीपासून ५ किमी अंतरावर ट्रक व बोलेरो गाडीत झालेल्या अपघातात अहेरी तालुका टॅक्सी चालकमालक संघटनेचा अध्यक्ष ठार झाल्याची घटना १४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
१४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर आलापल्लीपासून ५ किमी अंतरावर ट्रक एमएच ३४ ए ६६४४ वर बोलेरो एमएच ३३ ए २१८८ आदळली. यात बोलेरो गाडी पूर्णत: चुराडा झाली व या अपघातात नागेपल्ली येथील गाडीचालक स्वप्नील कावरे (३२) हा ठार झाला. घटनेची माहिती मिळताच आलापल्ली येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व अहेरी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतकाचे शव ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाहन ताब्यात घेतले आहे.
मृतक हा अहेरी तालुका टॅक्सी चालकमालक संघटनेचा अध्यक्ष होता. बोलेरो वाहन बल्लारशहावरून आलापल्लीकडे येत होते. या घटनेत आणखी एक इसम जखमी झाला असून त्याचे नाव राजू आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्याच्यावर सेवा सदन हॉस्पीटल आलापल्ली येथे उपचार सुरू आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)