शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडातील पोलीस हवालदारावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:44 IST

तालुक्यातील धोडराज येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात २९ डिसेंबर २०१५ रोजी आम्ही महिलांनी भामरागडात मोर्चा काढला.

एसडीओंना निवेदन : महिला एकवटल्यागडचिरोली : तालुक्यातील धोडराज येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात २९ डिसेंबर २०१५ रोजी आम्ही महिलांनी भामरागडात मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान भामरागडचे पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी आम्हा महिलांना अपशब्द बोलून धमकी दिली. सदर प्रकार गंभीर असल्याने पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अथवा त्यांची भामरागड येथून इतरत्र बदली करावी, अशी मागणी भामरागड येथील महिलांनी उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली.निवेदनात महिलांनी म्हटले आहे की, स्त्री अत्याचाराच्या विरोधात महिलांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. मात्र बलात्कार ही छोटीशी घटना आहे. मोर्चा कशाला काढला, अशी उलट विचारणा पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी महिलांना केली. मंथनवार यांच्या वागणुकीमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे महिलाविरोधी भूमिका घेणाऱ्या मंथनवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. मात्र कारवाई झाली नाही. येत्या १५ दिवसांत मंथनवार यांच्यावर कारवाई न झाल्यास १६ व्या दिवसापासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून एसडीओंना दिला आहे. निवेदन देताना रमा टेंभूर्णे, वसंती मडावी, अर्पणा सडमेक, भारती इष्टाम, सविता दास आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)