आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करा
By Admin | Updated: June 25, 2014 00:28 IST2014-06-25T00:28:41+5:302014-06-25T00:28:41+5:30
अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे

आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करा
निवेदन : अहेरी जिल्हा कृती समितीची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी
अहेरी : अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी हे पूर्वी सिरोंचा येथे कार्यरत होते. त्यानंतर अहेरी येथे रूजू झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरूद्ध तक्रारी केल्या आहेत. परंतु नोकरीवर गदा येण्याच्या भीतीपोटी कोणतेही कर्मचारी सार्वजनिकरित्या कोणतेच पावले उचलत नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्याची चौकशी केल्यास सत्यस्थिती बाहेर येईल, असे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यमान तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या वागणुकीसंदर्भात अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यासंदर्भात अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीकडेही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वीही १७ एप्रिल रोजी २०१४ रोजी आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतु कुठलीही कारवाही आरोग्य अधिकाऱ्यांवर करण्यात आली नाही, असे समितीचे म्हणणे आहे. निवेदन देतांना रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, अतुल उईके उपस्थित होते.