शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘ताे’ नरभक्षक वाघ हाेणार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

१४ एप्रिल राेजी कुरूड येथील व ३ मे राेजी चाेप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर देसाईगंज वनविभागाने वन्यजीव विभागाकडे परवानगी मागितली हाेती. या विभागाने परवानगी दिल्यानंतर २८ एप्रिल राेजी पथक दाखल झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगल परिसरात मागील २० दिवसांच्या कालावधीत दाेन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडाेबा येथील ९ जणांचे पथक दाखल झाले आहे.१४ एप्रिल राेजी कुरूड येथील व ३ मे राेजी चाेप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर देसाईगंज वनविभागाने वन्यजीव विभागाकडे परवानगी मागितली हाेती. या विभागाने परवानगी दिल्यानंतर २८ एप्रिल राेजी पथक दाखल झाले आहे. यापूर्वी नागझिरा अभयारण्यातील आठ जणांची टीम आली हाेती. ही टीम आता परत जात आहे. त्यामुळे ताडाेबा येथील ९ जणांची टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून वाघाचा शाेध घेतला जात आहे. मात्र वाघ हुलकावणी देत आहे. 

लाखांदूरवरून देसाईगंजात दाखलनरभक्षक वाघाचे नाव सीटी-१ असे आहे. हा वाघ मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे. ताे काही दिवस लाखांदूर तालुक्यात हाेता. त्यानंतर हा वाघ देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगलात दाखल झाला आहे. हा वाघ नरभक्षक असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने सुरूवातीपासूनच या वाघापासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले हाेते. 

४० ट्रॅप कॅमेऱ्यांनी शाेधवाघाला शाेधून   काढण्यासाठी वनविभागाने शिवराजपूर, उसेगाव जंगल परिसरात विविध ठिकाणी ४० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच पथक जंगलात  फिरून वाघाचा शाेध घेत आहे. 

शिवराजपूर-उसेगाव मार्गावर रात्री प्रतिबंधशिवराजपूर-उसेगाव हे चार किमीचे अंतर आहे. यादरम्यान जंगल आहे. याच परिसरात सदर वाघ आढळून येत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवाशांना धाेका हाेऊ नये, यासाठी या मार्गावरून सायंकाळनंतर दुचाकी, सायकलस्वार व पायदळ व्यक्तीला जाण्यास प्रतिबंध घातला जातो. यासाठी शिवराजपूर व उसेगावच्या दाेन्ही बाजूला वनविभागाचा नाका तयार करण्यात आला आहे. 

नागरिकांवर हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही सावधानता बाळगावी. जंगलात जाऊ नये. स्थानिक नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. - धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, देसाईगंज

 

टॅग्स :Tigerवाघ