शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: May 14, 2017 01:47 IST

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी,

खासदारांची भेट : दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटना लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने ९ मे पासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून साखळी उपोषणाला प्रारंभ केला. या उपोषणाची शनिवारी सांगता करण्यात आली. खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, भारत खटी, केशवराव भांडेकर, मधुकर भांडेकर, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. खा. अशोक नेते यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. दुर्गम भागातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून खासदारांनी चर्चा केली. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात मार्ग काढण्यास सांगितले. आ. डॉ. देवराव होळी यांनी ग्राम विकास विभागाचे सचिव यांची १६ मे रोजी मुंबई येथे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एम. एन. चलाख यांनी बाजू मांडली. मुदतवाढ घेऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. उपोषणकर्ते शिक्षक वाय. एम. खोब्रागडे, के. वाय. मांडवे, प्रशांत पुडकलवार, जे. वाय. मडावी, एन. पी. ठुरके, हेमंत चावरे यांना मान्यवरांनी लिंबूपाणी पाजले. उपोषण स्थळाला जि. प. सदस्य अजय कंकडालवार यांनीही भेट दिली होती. आंदोलनाला प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईक शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, कास्ट्राईब कल्याण महासंघ व दुर्गम भागातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.