शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

निवासी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 16, 2016 01:58 IST

शाळेत निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांची

इंदारामच्या बालिका विद्यालयातील प्रकार : शिक्षिकेशिवाय विद्यार्थिनी परतल्या खासगी आॅटोने
अहेरी : शाळेत निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांची असते. बाहेर स्पर्धा अथवा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांना ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असते. परंतु अहेरी नजीकच्या इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे सुरू असतानाही विद्यार्थिनींना शिक्षिकेशिवाय आॅटोने परतावे लागण्याची वेळ गुरूवारी सकाळी आली. विद्यार्थिनी खासगी आॅटोने शिक्षिकेशिवाय परतल्या. त्यामुळे येथील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थिनींची दररोज ने-आण केली जात आहे. परंतु ने-आण करताना त्यांच्यासमवेत शाळेतील शिक्षक अथवा शिक्षिका हजर असणे गरजेचे असते. मात्र खेळ संपल्यानंतर विद्यार्थिनींना खासगी आॅटोमध्ये बसवून त्यांची ने-आण सर्रास केली जात आहे. गुरूवारी सकाळी खेळ संपल्यानंतर विद्यार्थिनी इंदाराम येथे आॅटोने परतत असताना लोकमत प्रतिनिधीने याबाबत त्यांची विचारपूस केली असता, शिक्षिका आमच्यासोबत नाहीत. त्या अहेरीतच आहेत, असे सांगितले.
इंदाराम मार्ग अत्यंत दुरवस्थेत असून या मार्गावर नेहमीच अपघात घडत असतात. शिवाय आॅटोमध्ये केवळ विद्यार्थिनीच असल्याने अन्य दुर्घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यातच अहेरी-इंदाराम मार्गावर नियमित बससेवा आहे.
गुरूवारी आॅटोच्यासमोरच बस सुटलेली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये विद्यार्थिनींना बसविणे गरजेचे होते. मात्र सुरक्षिततेचा प्रवास सोडून विद्यार्थिनींची आॅटोने ने-आण करण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी प्रथम मुख्याध्यापिका व शिक्षिकांची असते. परंतु विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले. शारीरिक शिक्षिकेची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देण्यात आली. परंतु तरीसुद्धा इतर शिक्षिकांवर विद्यार्थिनींना ने-आण करण्याची जबाबदारी देणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)

विद्यार्थिनींना खेळासाठी ने- आण करण्याची जबाबदारी शारीरिक शिक्षिकेची असते. मी कालच सुटीवरून परतली. त्यामुळे आज घडलेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेकडून खुलासा मागविला जाईल.
- डी. वाय. ढवस, मुख्याध्यापिका, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, इंदाराम