शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: April 27, 2017 01:21 IST

येथील उपजिल्हा रूग्णालयातून जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अतिगंभीर

महेंद्र मोहबंशी यांची मागणी : बालिका दगावल्याचे प्रकरण कुरखेडा : येथील उपजिल्हा रूग्णालयातून जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अतिगंभीर अवस्थेत नवजात बालिकेला हलविण्यात येत असताना रूग्णवाहिकेत कोणताच डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे बालिका दगावली, असा आरोप करीत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील रूपलता सुनील उईके या महिलेला २३ एप्रिल रोजी प्रसूतीकरिता उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता तिने मुलीला जन्म दिला. मात्र मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने रूग्णालयातील परिचारिका मेघा माने हिने ८.२० वाजता १०८ रूग्णवाहिकेला बोलाविले. ९ वाजता रूग्णवाहिका रूग्णालयात हजर झाली. परंतु यावेळी केवळ चालक उपस्थित होता. कोणताच डॉक्टर हजर नव्हता. याच परिस्थितीत चालकांनी रूग्णाला वाहनात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे रवाना झाले. मात्र पोहोचेपर्यंत बालिका दगावली. या घटनेची माहिती मिळताच डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी १०८ रूग्णवाहिका सेवेचे गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याचे समन्वयक डॉ. प्रशांत माटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून येथील सेवेच्या दुरावस्थेची व घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली. डॉ. माटे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र तीन दिवसांचा कालावधी उलटूनही कारवाई झाली नाही, असा आरोप डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)