विषय समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनाच यश

By Admin | Updated: December 6, 2015 01:15 IST2015-12-06T01:15:23+5:302015-12-06T01:15:23+5:30

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा या चार नगर पंचायतीच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी पार पडली.

In the subject committee elections, the successors of the ruling party | विषय समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनाच यश

विषय समिती निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनाच यश

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा या चार नगर पंचायतीच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत ज्या पक्षाचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत, त्याच पक्षाला सभापती पदाच्या निवडणुकीत यश मिळाले आहे.
चामोर्शी नगर पंचायतीत बांधकाम सभापती म्हणून उपाध्यक्ष राहूल सुखदेव नैताम यांची वर्णी लागली. तर स्वच्छता व वैद्यक आरोग्य समिती सभापती पदी काँग्रेसचे विजय भास्कर शातलवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे सुमेध माणिकराव तुरे व महिला बालकल्याण सभापती पदी काँग्रेसच्या सविता सोमदेव पिपरे हे निवडून आले आहेत. स्वच्छता व वैद्यक आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसकडून विजय शातलवार, भाजपकडून प्रशांत एगलोपवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. शातलवार यांना तीन तर एगलोपवार यांना दोन मते मिळाली. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे सुमेध तुरे हे अविरोध निवडून आलेत. तर महिला बालकल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसकडून सविता पिपरे, भाजपकडून रोशनी वरघंटे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. पिपरे यांना तीन तर वरघंटे यांना दोन मते मिळाली. सविता पिपरे सभापतिपदी विजयी झाल्या तर याच समितीच्या उपसभापतिपदी काँग्रेसच्या सुनीता धोडरे यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य पदी काँग्रेसकडून वैभव भिवापुरे तर भाजपकडून रामेश्वर सेलुकर यांची नगर पंचायतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीवर सभापती म्हणून नगराध्यक्ष जयश्री पंकज वायलालवार यांची निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून एसडीओ तळपादे, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार यु. जी. वैद्य, नायब तहसीलदार चडगुलवार यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस निरिक्षक अवचार यांच्या नेतृत्वात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुरखेडा येथे नगर विषय समिती सभापती पदी सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-अपक्ष आघाडीने यश मिळविले. सार्वजनिक बांधकाम सभापती पदी अपक्ष नगरसेवक शाहेदा तबसूम ताहेर मुगल यांची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीवर शिवसेनेचे पुंडलिक देशमुख, स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समितीवर काँग्रेसच्या आशा तुलावी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी उपाध्यक्ष जयश्री धाबेकर यांची निवड करण्यात आली. या समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या चित्रा गजभिये यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य पदी शिवसेना, काँग्रेस व अपक्ष गटातर्फे उस्मान खॉ पठाण व भाजपतर्फे रामहरी उगले यांची निवड करण्यात आली.
सिरोंचा येथे भाजप, काँग्रेस व अपक्ष आघाडीने सभापती पदाच्या निवडणुकीत वरचष्मा कायम ठेवला आहे. बांधकाम सभापती पदी भाजपच्या ईश्वरी हनुमय्या बुध्दावार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी भाजपचे विजय तुळशीराम तोकला, आरोग्य समितीच्या सभापती पदी नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष काँग्रेसच्या मुमताज खान हुसेन खान यांची वर्णी लागली आहे. महिला व बालकण्याण सभापती पदी अपक्ष राजेश नरेश तडकलवार यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत सदस्य पदी भाजपकडून संदीप राचर्लावार तर राकाँकडून नागेश गांगपुरपु यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अशोक कुमरे यांनी काम पाहिले.

Web Title: In the subject committee elections, the successors of the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.