शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भारत भ्रमणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:13 IST

आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे४४ विद्यार्थी करणार सहल : टी.एस.पी. योजनेतून घडणार विमानवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे. सहलीतील या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांना विमानवारीही घडणार आहे.गडचिरोली प्रकल्पात २४, अहेरी ११, भामरागड ८ अशा एकूण ४४ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये यावर्षी शिकणाºया इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीत सहभागी होता येणार आहे. या सहलीदरम्यान दिल्ली येथील कुतुबमीनार, लोटस टेम्पल, लाल किल्ला, राष्टÑपती भवन, संसद भवन, राजघाट, स्पोर्ट अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम, आग्रा येथील ताजमहल, आग्रा किल्ला, फत्तेपूर शिकरी, जयपूर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळणार आहे. याशिवाय सहलीतील विद्यार्थी राष्टÑपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री आदींची भेट घेणार आहेत.मागील वर्षी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या व वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुला, मुलींची ३० सप्टेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान प्रकल्पस्तरावर निवड चाचणी होणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील विद्यार्थ्यांची निवड चाचणी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तर अहेरी व भामरागड प्रकल्पातील विद्यार्थ्यांची परीक्षा आलापल्ली येथे होणार आहे. सदर निवड परीक्षेतून ४४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची भारत भ्रमण सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये २२ मुले व २२ मुलींचा समावेश राहणार आहे. सदर परीक्षेला गडचिरोली प्रकल्पातील १९०, अहेरी प्रकल्पातील ८८ व भामरागड प्रकल्पातील ६४ असे एकूण ३४२ विद्यार्थी बसणार आहेत.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रयत्नाने प्रथमच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेच्या माध्यमातून भारत भ्रमणाची संधी मिळणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी विकासाच्या वतीने प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे.

टॅग्स :tourismपर्यटन