स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:22 AM2018-10-03T01:22:58+5:302018-10-03T01:23:27+5:30

संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी,.....

The struggle for independent Vidarbha state creation is intense | स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा तीव्र

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा तीव्र

Next
ठळक मुद्देगडचिरोलीत धरणे, अहेरीत निदर्शने : विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक उपोषणावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/अहेरी : संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी, या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोली व अहेरीच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी मंगळवारला धरणे देण्यात आले. अहेरीत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे यांच्या नेतृत्वात दिवसभर धरणे देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव देविदास मडावी, जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र नांदगाये, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा तामशेटवार, मनोहर हेपट, उद्धवराव डांगे, राजू नैताम, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, मुकूंदा उंदीरवाडे, दादाराव चुधरी, दादाजी चापले, गोविंदा बानबले, पंडित पुडके, सुधाकर डोईजड, प्रवीण ब्राह्मणवाडे, दत्तात्रय बर्लावार, गोवर्धन चव्हाण, दत्तात्रय खरवडे, गुरूदेव भोपये, विनायक बांदुरकर, जनार्धन साखरे, हंसराज उराडे, बाळू मडावी, प्रभाकर बारापात्रे, प्रदीप महाजन, मनीषा सजनपवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे आश्वासन वैदर्भीय जनतेला दिले होते. मात्र त्यानंतर या प्रश्नाकडे सत्ताधारी भाजप पक्षाचे दुर्लक्ष झाले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे, मोर्चे, उपोषण, निदर्शने व इतर अनेक आंदोलने लोकशाही मार्गाने करण्यात आली. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही. विदर्भाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे, असे गडचिरोली येथे झालेल्या आंदोलनात समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केले. यावेळी प्रा.नागसेन मेश्राम, रवी भांदककर, विलास रापर्तीवार, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, मोहन मेश्राम, प्रदीप देशपांडे, पार्वता मडावी, वंदना सडमेक, सुमन पोरतेट, नागू आत्राम, विमल मडावी, गंगू मेश्राम, शैला कुसराम, किरण भांदककर आदी उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार गुरूनुले यांनी स्वीकारला.

Web Title: The struggle for independent Vidarbha state creation is intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.