शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पगारवाढीनंतरही संपावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन पुकारले. यानंतर चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र, एस. टी. कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बुधवारी वेतनवाढीची घाेषणा केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या संपावर ताेडगा काढण्यासाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याची घाेषणा बुधवारी केली. पगारवाढीच्या घाेषणेनंतर गुरूवारी एस. टी. कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, जिल्ह्यातील एकही संपकरी कर्मचारी कामावर पाेहाेचला नाही. त्यामुळे गुरूवारी एस. टी. महामंडळाचे कामकाज ठप्प पडले हाेते. एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन पुकारले. यानंतर चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र, एस. टी. कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बुधवारी वेतनवाढीची घाेषणा केली. यात १० वर्षांची सेेवा झालेल्यांना ५ हजार रूपयांची वाढ, २० वर्ष सेवा झालेल्यांना ४ हजार रूपये तर २० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्यांना २ हजार ५०० मूळ वेतनात वाढ केली आहे. या वेतनवाढीनंतर काही कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, गडचिराेली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी आगारातील एकही कर्मचारी कामावर गेला नाही. जाेपर्यंत विलिनीकरण हाेत नाही, ताेपर्यंत कामावर जाणार नाही, अशी प्रतिक्रिया एस. टी. कर्मचाऱ्यांनी दिली.  त्यामुळे हा संप आणखी किती दिवस चालणार, हे सांगणे कठीण  आहे.

गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घ्या-   २४ दिवसांपासून सुरू असलेल्या एस. टी.च्या संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहनधारक मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट करत आहेत. या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन आमदार डाॅ. देवराव होळी यांनी गुरुवारी गडचिरोली येथील एस. टी. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मंडपाला भेट देऊन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे,  सदस्य शंकर नैताम यांच्यासह एसटी आगाराचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप