शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाला आग लावणाऱ्यास अटक

By admin | Updated: April 4, 2017 00:52 IST

आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील राखीव जंगलाला आग लावून मौल्यवान संपत्तीचे नुकसान करताना वनाधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहात अटक केल्याची घटना रविवारी घडली.

आलापल्ली वनपरिक्षेत्रातील घटना : वनकायद्यान्वये कारवाईआलापल्ली : आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील राखीव जंगलाला आग लावून मौल्यवान संपत्तीचे नुकसान करताना वनाधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहात अटक केल्याची घटना रविवारी घडली. सुनील प्रेमानंद बिश्वास (४५) रा. स्कुल परा पी. व्ही. ८६ नेताजी नगर कांकेर कुरेनर जिल्हा छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सध्या अहेरीच्या तालुक्याच्या पेरमिली येथील रहिवासी आहे. आलापल्ली वनविभागाअंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ८ मधील राखीव वनामध्ये सुनील प्रेमानंद बिश्वास याने प्रवेश केला. जंगलाला आग लावून मौल्यवान वस्तूंचे नुकसान केले. याप्रकरणी आरोपी सुनील बिश्वास याला वनाधिकाऱ्यांनी अटक केली. आरोपीने वनामध्ये अपप्रवेश करून ज्वलनशील पदार्थ उद्देशपूर्व वनात घेऊन गेला व आग लावण्याचा वन गुन्हा केला. आरोपी सुनील बिश्वास याच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (अ) (ड) (फ) तसेच जैवविविधता अधिनियम २००२ चे कलम ५६ नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आलापल्लीचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला एन यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील, क्षेत्र सहायक विनोद शिंदे, वनरक्षक प्रदीप गेडाम, वनरक्षक भगवान नागोसे करीत आहेत. (प्रतिनिधी)