गडचिरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:03 IST2017-11-24T22:03:38+5:302017-11-24T22:03:48+5:30
गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सद्य:स्थितीत धानोरा मार्गावरील स्नेहनगरात काम सुरू असून इतरही वार्डांमध्ये डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.

गडचिरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सद्य:स्थितीत धानोरा मार्गावरील स्नेहनगरात काम सुरू असून इतरही वार्डांमध्ये डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.
नागोबा मंदिर ते अजय उरकुडे यांच्या घरापर्यंत, चामोर्शी रोड-त्रीरत्न बौध्द विहार-गलगट-तुकडोजी महाराज मंदिर, खरवटे ते चापले यांच्या घरापर्यंत, कांबळे यांच्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत, बंडीवार ते ठाकरे यांच्या घरापर्यंत, कथीले ते राऊत, रामनगर ते पोटेगाव मार्ग, चामोर्शी मार्ग ते पोटेगाव बायपास मार्ग, तसेच मोतीराम बोबाटे यांच्या घरापासून चटक डोंगरे यांच्या घरापर्यंतच्या १० रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. नगरोत्थान, रस्ता अनुदान व दलित वस्ती अनुदानांतर्गत सदर कामे करण्यात येत असून यासाठी १ कोटी ११ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.